नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खडकाळी येथील रमाबाई आंबेडकरनगर भागात घरासमोरून जाणा-या सांडपाण्यावरून वाद घालत शेजा-यांनी एका महिलेस मारहाण करीत तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चार जाणांविरूध्द विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
सिध्दार्थ तमखाने, अर्चना सोनवणे, विमलबाई केदारे व नयन केदारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. पीडित महिला व संशयित एकाच भागातील रहिवासी असून त्यांच्यात घरासमोरून वाहणा-या गटारीच्या पाण्यावरून वाद आहे. बुधवारी (दि.१६) पीडिता दुपारच्या सुमारास आपल्या घरासमोर धुणे भांडे चे काम करीत असतांना ही घटना घडली.
संतप्त संशयितांनी सांडपाण्याच्या कारणातून वाद घातल तिला शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी दोघा संशयितांनी तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.
५० हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरीला
सिडकोतील महाराणा प्रताप चौकात घरात शिरून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही घटना घडली असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रियाजअली मशहुरअली खान (२५ रा.लकी बिर्याणी सेंटरच्या वर,महाराणा प्रताप चौक) यांनी तक्रार दाखल केली आहे.
खान गेल्या २४ जुलै रोजी दुपारच्या सुमारास अल्पशा कामासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात शिरून टेबलावरील सुमारे ४९ हजार ५०० रूपये किमतीचे व ओपो आणि विवो कंपनीचे दोन मोबाईल चोरून नेले. अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten