गंगापूर रोडला रस्त्याने पाठलाग
नाशिक – रस्त्याने पाठलाग करून एकाने तरूणीचा विनयभंग केल्याची घटना गंगापूर रोड वरील मॉडर्न मार्केट भागात घडली. पिडीतेच्या आईने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन राजगुरु (वय २२,) असे तरूणीचा विनयभंग करणाºया संशयीताचे नाव आहे. पिडीत तरूणी आकाशवाणी केंद्र भागात राहणाºया तिच्या मैत्रीणीला भेटण्यासाठी जात असतांना ही घटना घडली. निलांबरी लॅब परिसरात संशयितांनी पाठलाग करीत तिचा विनयभंग केला. संशयीत गेल्या २८ सप्टेंबर २०१९ पासून तर १४ जून २०२१ पर्यत वेळोवेळी पाठलाग करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने
नाशिक – फ्लॅट दाखविण्याच्या बहाण्याने एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना पंचवटी मार्केट यार्ड भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसन्ना सुभाष सायखेडकर ( रा.विकास कॉलनी, त्र्यंबक रोड ) असे संशयीताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीतीनुसार संशयिताने दि. ९ जून रोजी पिडीतेला फ्लॅट बघण्यासाठी बोलविले होते. महिला सदर इमारतीतील फ्लॅट मध्ये आली असता सोबत कोणी नसल्याची संधी साधत संशयीताने दमदाटी करीत महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक धनश्री पाटील तपास करीत आहे.
अल्पवयीन मुलीस मारहाण, एकास अटक
नाशिक – अल्पवयीन मुलीस मारहाण व जीवे मारण्याची धमकी देवून एकाने विनयभंग केल्याची घटना सिडकोतील विजयनगर भागात घडली. याप्रकरणी पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयीतास अटक करण्यात आहे.
राहूल कैलास देवरे (वय ३४, बजरंगचौक, विजयनगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहीतीनुसार मंगळवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संशयिताने अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिला दमबाजी करीत तसेच जीवे मारण्याची धमकी देवून विनयभंग केला. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी पोलीसात धाव घेत तक्रार दाखल केली असून संशयीतास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.