नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गॅसच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. पंधरा दिवसापूर्वी ही घटना घडली होती. भारतीबाई भरतराव सुर्यवंशी (५४ रा.हिरावाडी पंचवटी) असे मृत महिलेचे नाव आहे. सुर्यवंशी यांच्यावर मुंबईनाका परिसरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारसुर्यवंशी या गेल्या १८ ऑगष्ट रोजी रात्री आपल्या राहत्या घरात गॅसवर स्वयंपाक करीत असतांना ही घटना घडली होती. गॅस गळती मुळे अचानक भडका उडाल्याने त्या गंभीर भाजल्या होत्या. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ मुंबईनाका येथील शताब्दी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. गेली पंधरा दिवस त्या मृत्यूशी झुंज देत होत्या. रविवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास जमादार वणवे करीत आहेत.
महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी केली लंपास
म्हसरूळ मखमलाबाद लिंकरोड परिसरात फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय महिलेच्या गळय़ातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा सुदाम गायकवाड (रा. ओमकारनगर,म्हसरूळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
गायकवाड या शनिवारी (दि.२) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. म्हसरूळ मखमलाबाद लिंकरोडने त्या आपल्या घराच्या दिशेने पायी जात असतांना चाणक्यपुरी सोसायटी समोर समोरून आलेल्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळय़ातील सुमारे २० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Women Death Chain Snatching