नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅम्प येथील एका महिलेस पाच लाख रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीत भागीदार करण्याचे आमिष दाखवून दाम्पत्याने ही फसवणूक केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत सनासे (३८) व प्रिया सनासे (३२ रा.मोरवाडी,सिडको) अशी ठकबाज संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी मनिषा रमेश आरोटे (४१ रा. सह्याद्रीनगर,दे.कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. समासे दांम्पत्याने सन.२०२१ मध्ये आरोटे यांचा विश्वास संपादन करून ही फसवणुक केली.
दुर्वांकुर मेकाट्रॉनिक्स नावाच्या कंपनीत भागीदार करण्याचे आमिष दाखविले होते. त्या मोबदल्यात पाच लाखाची रक्कम स्विकारण्यात आली होती. मात्र दोन वर्ष उलटूनही सनासे दांम्पत्याने कंपनीत भागीदार केले नाही तसेच पैसेही परत न केल्याने आरोटे यांनी पोलिसात धाव घेतली असून अदिक तपास उपनिरीक्षक पाडवी करीत आहेत.