नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पत्नी व प्रेयसी पोलिसांसमोरच एकमेकांना भिडल्याची घटना नाशिकरोड पोलिस स्थानकात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. पतीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधाचे बिंग फुटल्यानंतर पत्नीने नाशिक रोड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये पतीची प्रेयसीही आली. एकमेकांना बघून दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद व शिवीगाळ झाली. त्यानंतर दोन्ही महिला पोलिसांसमोरच एकमेकांना भिडल्या.
विशेष म्हणजे हे भांडण सुरु असतांना पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस कर्मचारी नव्हते. त्यामुळे पोलिसांचीही अडचण झाली. त्यानंतर पोलिसांनी महिला कर्मचा-यांशी संपर्क साधून ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर दोघींना धरून बाजूला नेण्यात आले. यानंतर यावादावर पडदा पडला. यानंतर पोलिसांनी विचारपूस केली असता पतीच्या प्रेमसंबंधाचे कारण पुढे आले. त्यानंतर त्या का भिडल्या हे पोलिसांना कळाले.
बेलतगव्हाण व सौभाग्यनगर भागातील या दोन्ही महिला आहेत. शनिवारी सायंकाळी वाद झाला होता. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्या दोघीही नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी आल्या होत्या. पोलिस ठाण्यात पुन्हा समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला, यावेळी दोघीही एकमेकांना भिडल्याने फ्री स्टाईल हाणामारी झाली. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलिस करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Wife Girl Friend Fight Police Station