नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तपोवन भागात विधवेच्या असहाय्यतेचा फायदा उचलत परिचीताने पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना घडली. विकास बाळासाहेब आनंदराव (३५ रा.दातेचाळ, सहजीवननगर, गणेशवाडी) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पसार झालेल्या संशयिताचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ वर्षीय विधवा पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि पीडिता एकमेकांचे परिचीत असून महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. पीडितेच्या एकटेपणाचा आणि असहाय्येतेचा फायदा उचलत संशयित गेल्या अनेक दिवसांपासून तिचा पाठलाग करून त्रास देत होता.
मंगळवारी (दि.२५) रात्री औरंगाबाद रोडने पीडिता आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. तपोवनातील सिटीलिंक बसडेपो परिसरात पाठलाग करीत आलेल्या संशयिताने महिलेची वाट अडवित तिचा विनयभंग केला. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651505106456834050?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1651505077386121217?s=20
Nashik city crime Widow Women Molestation