नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळ्या भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला गेल्या. याप्रकरणी पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना जेलरोड भागात घडली. ऋषीकेश रमेश घोडे (रा.जयभवानीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घोडे यांची केटीएम दुचाकी एमएच १५ एचएल १५०८ जेलरोड परिसरातील त्रिवेणी पार्क येथील हरिकृष्ण सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना सोमवारी (दि.७) रात्री घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
दुसरी घटना पेठरोडवर घडली. देवळाली कॅम्प परिसरातील जयराम गोपालदास चावला (रा. संसरी लेन ०१, देवळाली कॅम्प) हे बुधवारी (दि.९) पेठरोडवरील शरदचंद्र मार्केट यार्डात आले होते. जय मॉ शेरावाली कंपनीसमोर त्यांनी आपली दुचाकी एमएच १५ ईटी ६९७१ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कोरडे करीत आहेत.
जुगार खेळण्यास प्रवृत्त करणा-यावर पोलिसांनी केली कारवाई
जुने सिडकोतील लेखानगर भागात जुगार खेळण्यास प्रवृत्त करणा-या एकावर पोलिसांनी कारवाई करुन संशयिताच्या ताब्यातून जुगाराच्या साहित्यासह रोकड हस्तगत केले. अनिल सटवा आठवले (४९ रा. लेखानगर झोपडपट्टी, सिडको) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखानगर येथील पाण्याची टाकी जवळील वॉल जवळ तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मटका जुगार खेळतांना व लोकांना खेळवितांना मिळून आला. या कारवाईत साडे पाचशे रूपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार शिरसाठ यांनी तक्रार दाखल केल्याने या गुह्याची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार शिवाजी राऊत करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
nashik city crime Vehicle theft