नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात पार्क केलेली मालवाहू पिकअपसह दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सिडकोतील गणेशमल जगदीश प्रसाद राठी (रा.विजयनगर, सिडको) यांची दोन लाख रूपये किमतीची मालवाहू पिकअप एमएच १५ एफव्ही १०७३ गेल्या गुरूवारी (दि.८) रात्री विजयनगर परिसरातील एजाज एन्टरप्रायझेस या दुकानासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.
दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. लक्ष्मीनारायण रामबिलास कासट (रा.वॉस्को हॉटेल समोर,ना.रोड) यांची ज्युपिटर दुचाकी एमएच १५ ईएल ५९९६ गेल्या शुक्रवारी (दि.९) परिसरातील राजेंद्र कॉम्प्लेक्स या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.