नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहनचोरीच्या दोन घटनेत घरासमोर पार्क केलेल्या स्कार्पिओसह दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या घटना वेगवेगळया भागात घडल्या असून याप्रकरणी मुंबईनाका आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र नारायण रेड्डी (रा.छत्रपतीनगर,अंबडलिंकरोड सिडको) यांची सुमारे सहा लाख रूपये किमतीची स्कार्पिओ एमएच ०४ एचएफ ६६९४ बुधवारी (दि.२४) रात्री मुरलीधर नगर येथील गायत्री निवास भागात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
दुसरी घटना तिडके कॉलनीत घडली. सागर हंसराज कुमट (रा.नयनतारा सिटी १, तिडके कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. कुमट यांची एमएच १५ सीएफ ९६७७ दुचाकी गेल्या २९ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.