नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणातून टोळक्याने धुडघूस घालत परिसरातील घरांवर दगडफेक केल्याची घटना जेलरोड येथील चंपानगरी भागात घडली. या घटनेत कोयत्याचा धाक दाखवित व नागरीकांना शिवीगाळ करीत परिसरता दहशत माजविली असून याप्रकरणी एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश सुभाष गायकवाड (रा.कॅनलरोड,चंपानगरी) अभी तडवी व आकाश लोंढे अशी परिसरात दहशत माजविणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी सविता मेटे यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार महिला एकाच कॉलनीत राहत असून महिलेच्या नणंदने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी संशयिताविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात तक्रार दिल्याने संतप्त संशयितांनी शनिवारी (दि.२९) रात्री हातात लाठ्या काठ्या व कोयता घेवून येत महिलेच्या घराच्या गेटला लाथा मारल्या तसेच परिसरातील नागरीकांना व महिलेच्या नातेवाईंकाच्या घरासमोर शिवीगाळ करीत दगडफेक केली. कोयत्याच्या धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.
अशोकनगरला शेजाऱ्यांनीच केला दोघांवर चाकू हल्ला; बापलेकावर गुन्हा दाखल https://t.co/3qrVZKaySE
— India Darpan Live (@IndiaDarpanLive) October 31, 2022
Nashik City Crime Upnagar Stone pelting Police