मंगळवार, ऑगस्ट 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळ्या भागात तिघांनी संपवले जीवन

by Gautam Sancheti
ऑगस्ट 22, 2023 | 4:56 pm
in क्राईम डायरी
0
crime 6


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहर परिसरात वेगवेगळया भागात राहणा-या तीन जणांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर दोघांनी गळफास लावून आपले जीवन संपविले. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत पाथर्डी फाटा भागातील सुनिल विश्वासराव पाटील (५२ रा.सिध्दीविनायक पार्क एकता ग्रीन व्हिला जवळ,पाथर्डी फाटा) यांनी गेल्या गुरूवारी (दि.१७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. मुलगी राणू पाटील यांनी त्यांना तातडीने नजीकच्या वक्रतुंड हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता रविवारी (दि.२०) त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. याबाबत इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.

दुस-या घटनेत सिडकोतील प्रविण विनायक पाटील (४० रा.सिंहस्थनगर) यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच बाळकृष्ण पाटील यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.

तिसरी घटना जेलरोड भागात घडली. रामदास बहिरू डगळे (५२ रा. श्री विठ्ठल को ऑप सोसा, जुना सायखेडारोड) यांनी सोमवारी दुपारच्या सुमारासच्या अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या कडीला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा कुणाल डगळे याने त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक कु-हाडे करीत आहेत.

Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला नागरिकांचा चोप…

Next Post

Nashik Crime शहरातून कारसह दोन मोटारसायकली चोरीला

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime

Nashik Crime शहरातून कारसह दोन मोटारसायकली चोरीला

ताज्या बातम्या

Indian Flag

स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता…राजशिष्टाचार विभागाकडून हे निर्देश जारी

ऑगस्ट 12, 2025
Untitled 14

नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराम गारे यांचे निधन…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या मोठया व्यक्तींबरोबर केले संघाचे प्रचारक म्हणून कार्य

ऑगस्ट 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या, मंगळवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 11, 2025
trump 1

अमेरिकेने लावलेले आयात शुल्क व कापड निर्यात धोरण व सद्यस्थिती नेमकी काय आहे…

ऑगस्ट 11, 2025
mahavitarn

महावितरणच्या स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदर…या गोष्टी सुध्दा मोबाईलवर उपलब्ध

ऑगस्ट 11, 2025
Indian Flag

कुठल्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार?…बघा संपूर्ण यादी

ऑगस्ट 11, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011