नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आडगाव नाका परिसरातील संतोष टी पॉईंट भागात गॅस सिलेंडर पोहचविणा-या ट्रकसह रिकामे सिलेंडर चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी गॅस टाक्यांसह सुमारे ४ लाख ४ हजार रूपये किमतीचा आयशर ट्रक पळवून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनल अशोक पगारे (रा.रामकथा सोसा.मखमलाबाद शिवार) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पगारे यांचा सिलेंडर डिलेव्हरीचा व्यवसाय आहे. मंगळवारी (दि.२२) दुपारच्या सुमारास रिकाम्या गॅस टाक्यानी भरलेला आपल्या ताब्यातील आयशर मालट्रक त्यांनी संतोष टी पॉईंट येथील गो गॅस पंपासमोरील रस्त्यावर पार्क केला असता ही घटना घडली. असून अधिक तपास जमादार वणवे करीत आहेत.
गोदाघाटावर गांजा विक्री करणा-या दोन जणांना पोलिसांनी केले गजाआड
गोदाघाटावर गांजा विक्री करणा-या दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या संशयितांच्या ताब्यातून गाजाच्या पुड्या हस्तगत केल्या आहे. सुशिल भिमबहाद्दूर नेपाली (२४ मुळ रा.नेपाळ हल्ली कथडा जुने नाशिक) व रोहित दत्तात्रेय साळवे (२३ रा.कुमावतनगर,पेठरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोदाघाटावर राजरोसपणे गांजा या अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (दि.२३) सापळा लावला असता दोघे संशयित पोलिसांच्या जाळयात अडकले. सुशिल नेपाली हा गाडगे महाराज पुलाखाली तर रोहित साळवे हा इंद्रकुंड भागातील सुलभ शौचालय भागात गांजाची विक्री करतांना मिळून आला. संशयितांच्या ताब्यातून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांना विक्रीसाठी गांजा पुरविणा-या मुख्यसुत्रधारांचा शोध पोलिस करीत आहे. याबाबत पोलिस शिपाई घनश्याम महाले आणि पोलिस नाईक संदिप मालसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार शेवाळे आणि माळोदे करीत आहेत.
Nashik City Crime Theft Truck Police