नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात असून रविवारी वेगवेगळ्या भागात राहणा-या दोन जणांनी आत्महत्या केली. याप्रकरणी नाशिकरोड व गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
पहिली घटना औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. रेखाबाई राजू जाधव (४० रा.आई हॉस्पिटल जवळ,विठ्ठल चौक) या महिलेने शनिवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरात अज्ञात कारणातून विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच मुलगा छोटू जाधव यांनी तिला तात्काळ नजीकच्या संकल्प हॉस्पिटल येथे दाखल केले असता रविवारी उपचार सुरू असतांना डॉ. राहूल येवले यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सरनाईक करीत आहेत.
दुस-या घटनेत निवृत्ती शंकर डगळे (६५ रा.बोराडे मळा,प्रगतीनगर जेलरोड) यांनी रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून पंचक येथील नाल्याशेजारील पत्र्याच्या शेड परिसरातील रामफळाच्या झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत विनोद बोराडे यांनी दिलेल्या खबरीवरून नशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.
बसमध्ये चढतांना मोबाईल चोरी
ठक्कर बाजार बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना प्रवासी तरूणाचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सिध्देश अनिल गिते (२१ रा. जाधव कॉलनी मखमलाबाद रोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिते हे रविवारी बाहेरगावी जाण्यासाठी ठक्कर बाजार बसस्थानक आवारात गेले असता ही घटना घडली. बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्याच्या खिशातील १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल हातोहात लांबविला. अधिक तपास पोलीस नाईक गायकवाड करीत आहेत.बसस्थानक आवारातील भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाश्यामधून होत आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten