नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गोदाघाटावर अधिकमासाच्या निमित्त गोदास्नान करण्यासाठी आलेल्या तरूण पर्यटकाच्या गळयातील सोनसाखळी भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी मधु सच्छीदानंद ठाकुर (२७ रा.उल्हासनगर,ठाणे) या युवकाने तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून भामट्याचा शोध घेत आहेत.
ठाकुर कुटुंबिय रविवारी (दि.१३) देवदर्शनासाठी शहरात आले होते. अधिकमासानिमित्त संपूर्ण कुटुंबिय गोदास्नान करीत असतांना ही घटना घडली. मधू ठाकूर हा युवक रामकुंडात आंघोळ करीत असतांना अज्ञात भामट्याने गर्दीची संधी साधत त्याच्या गळय़ातील सुमारे २५ हजार रूपये किमतीचे व हनुमानाचे पँडल असलेली सोनसाखळी ओरबाडून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक सुनिल बावा करीत आहेत.
रस्ते अपघातात युवकाचा मृत्यू
त्र्यंबकरोडवरील एबीबी सर्कल भागात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. विशाल अभिमान मासुळ – पाटील (२० मुळ रा. चित्तोड ता.जि.धुळे हल्ली डीजीपीनगर,आंबेडकर नगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाटील रविवारी एमएच १५ बीडब्ल्यू ०७१५ या दुचाकीने त्र्यंबकरोडवरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. एबीबी सर्कल भागात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर अवस्थेत जखमी झाला होता. १०८ अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस शिपाई एस.जी.पवार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten