नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगीक वसाहतीत कारखान्यातून केबल चोरी करणा-या चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. या चोरट्यांनी सुमारे ४५ हजार रूपये किमतीची प्लॅस्टिक आवरण असलेली तांब्याची केबल चोरून नेली होती. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय तुकाराम घुले (२६ रा.संतोषीमाता नगर,सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
आयएससी इंडरनॅशनल इंडिया प्रा.लि. या कारखान्याच्या स्टोअर रूममधून गेल्या २४ आॅगष्ट रोजी चोरट्यांनी सुमारे ४५ हजार रूपये किमतीची केबल चोरून नेली होती. याबाबत श्रीकांत पाटील (रा.वनवैभव कॉलनी,इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संशयितास हुडकून काढले असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
जुगार खेळणा-या पाच जणांवर पोलिसांनी कारवाई
जुगार खेळणा-या पाच जणांच्या टोळक्यावर पोलिसांनी कारवाई करत जुगाराच्या साहित्यासह रोकड जप्त केली आहे. गोविंदनगर मार्गावर उघड्यावर हे जुगारी जुगार खेळत होते. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी हनुमंत गुंजाळ (३८ रा. लक्ष्मण नगर, पंचवटी), राजू शिवाजी आंबोरे (४८ रा. मौले हॉल मागे अशोकनगर), संजय लकडू शिंदे (४१ रा. उंटवाडी), विक्रम प्रकाश जाधव (३२) व अर्जुन मनोहर गायकवाड (३२ रा. दोघे शनिमंदिराजवळ, लक्ष्मणनगर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत युनिट २ चे हवालदार सानप यांनी तक्रार दाखल केली आहे. तिडकेनगर परिसरातील सीटीसेटर मॉल ते गोविंदनगर रोडवरील नादब्रम्हा कौलारू घराजवळ काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास पथकाने धाव घेत छापा टाकला असता संशयित कल्याण मटका नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना पोलिसांच्या हाती लागले. संशयितांच्या ताब्यातून सुमारे साडे दहा हजार रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चेमगर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Theft Police Arrest