नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुगार खेळणा-या पाच जणांवर कारवाई करत पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुारे साडे अकरा हजाराचा ऐवज जप्त केला. सिडकोतील सावतानगर भागात हे जुगारी जुगार खेळत होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात जुगार अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष गोविंद तांबट (रा.घुगे चाळ,पंडीतनगर),राहूल कैलास शेवाळे (रा.आहिल्याबाई पुतळा,पवननगर), कुणाल रतन करोटे, विजय उत्तमराव कदम (रा.दोघे सावतानगर,सिडको) व विठ्ठल पोपट आहेर (रा.धन्वंतरी कॉलेज मागे,कामटवाडे) अशी संशयित जुगारींची नावे आहेत. सावतानगर येथील बजरंग चौकात असलेल्या महापालिकेच्या व्यायाम शाळा आवारात काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी पोलिसांनी छापा टाकला असता संशयित पत्यांच्या कॅटवर तीन पत्ती जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून रोकड व जुगाराचे साहित्य असा सुमारे ११ हजार ५६० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई संदिप भुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक देशमुख करीत आहेत.
गॅलरीतून चढत चोरट्यांनी बंद दुकानातील गल्यातील रोकड व मोबाईल चोरट्यांनी केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुने नाशिक येथील नानावली भागात गॅलरीतून चढत चोरट्यांनी बंद दुकानातील गल्यातील रोकड व मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे साडे तेवीस हजार रूपये किमतीच्या ऐवज चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी सुरेश रामदास खैरे (रा.अमरधामरोड,नानावली) यांनी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खैरे यांचे गुमशा बाबा दर्गा परिसरात अनिरूध्द नावाचे किराणा दुकान आहे. शनिवारी (दि.१२) रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या गॅलरीत चढून दुकानात प्रवेश केला व गल्यातील रोकड आणि मोबाईल असा सुमारे २३ हजार २०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten