नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गावातील होलसेल किराणा दुकान फोडून चोरट्यांनी तेलाचे डबे आणि पाऊच बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे १ लाख २ हजार ५०० रूपये किमतीचा साठा चोरट्यांनी चोरून नेला आहे.
या चोरीप्रकरणी दिलीप भिमाजी झाडे (रा.झाडे वस्ती, श्रीकृष्णनगर, चिंचोली, ता.सिन्नर) यांनी तक्रार दाखल केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झाडे यांचे शिंदे गावातील कडवा पाटाच्या बाजूला गणेश होलसेल किराणा दुकान आहे.
शनिवारी (दि.२७) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे कुलूप तोडून ही चोरी केली. दुकानात शिरलेल्या चोरट्यांनी मुरली कंपनीचे तेलाचे डब्बे आणि पाऊच बॉक्स असा सुमारे १ लाख २ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.