नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे आठ लाख रूपयांचा ऐवज लंपास केला. द्वारका परिसरातील काठेगल्ली भागात ही घरफोडी झाली. यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिने चोरीला गेले आहे.
या प्रकरणी अनंत नारायणराव हिरे (रा.मन बंगला,काठेगल्ली) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरे कुटुंबिय बुधवारी (दि.२) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या सेफ्टी दरवाजाची जाळी कशाने तरी कापून ही चोरी केली. बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड,सोन्याचांदीचे व मोत्याचे दागिणे असा सुामरे ८ लाख ४२ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
द्वारका भागात महिलेला शिवीगाळ व विनयभंग
फोन लावण्यासाठी घेतलेला मोबाईल महिलेने न देता उलट शिवीगाळ व दमदाटी केल्याने याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नंदकुमार किसन चित्तोडे (रा. ४६, कामटवाडे) यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेस मदत करणे चित्तोडे यांना महागात पडले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली नागेश मोहेळकर (रा. त्रिमूर्ती सदन) असे मोबाईल देण्यास नकार देणा-या संशयित महिलेचे नाव आहे. चित्तोडे बुधवारी (दि.२) द्वारका परिसरातील खरबंदा पार्क भागात गेले होते. एचडीएफसी बँकेच्या एटीएम जवळून ते जात असतांना महिलेने त्यांना गाठले. यावेळी अर्जेंट फोन करावयाचा असल्याचे सांगून महिलेने त्यांचा सुमारे २९ हजाराचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला.
महिला फोन लावून बोलत असतांना चित्तोडे काही अंतराव थांबले. बोलणे झाल्यानंतर चित्तोडे यांनी त्यांच्या मोबाईलची मागणी केली असता ही घटना घडली. संतप्त महिलेने त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी करीत मोबाईल परत करण्यास नकार दिला. त्यामुळे चित्तोडे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गेंगजे करीत आहेत.
nashik city crime theft molestation police women dwarka kathe galli