नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोकस्तंभ परिसरातील जोशी वाडा भागात रस्त्याने पायी जाणा-या तरूणाच्या गळयातील सोन्याचे लॉकेट दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. याप्रकरणी वैभव अर्जुन कापडणीस (२१ रा.धनराज प्लाझा बिझनेस स्क्वेअर मागे,कॅनडा कॉर्नर) या युवकाने तक्रार दाखल केली असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कापडणीस शनिवारी (दि.५) अशोकस्तंभ भागात आला होता. रात्रीच्या वेळी तो लोकमान्यनगर भागातील जोशीवाडा समोरून पायी जात असतांना ही घटना घडली. शिवपूजा अपार्टमेंट समोरून तो पायी जात असतांना अपाची दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्याच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची पेंडल असलेली सोनसाखळी ओरबाडून नेली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भोये करीत आहेत. नाशिकमध्ये महिलांचे मंगळसूत्र लंपास करण्याच्या घटना रोजच घडत असतात. पण, आता चोरट्यांनी पुरुषांना लक्ष केले आहे. या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत असते. पण, तरी त्या चो-या बंद होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये याचा संताप आहे.
गांजा विक्री करणारे दोघे गजाआड
गांजा या अमलीपदार्थाची खरेदी विक्री करणा-या दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत अॅटोरिक्षासह दुचाकी आणि गाजांचा साठा असा सुमारे साडे तीन लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश भाऊसाहेब पाटोळे (३२ रा. लोहशिंगवे, ता.जि.नाशिक) व राजेश राजाराम गार्दुल (२५ रा.गिता चौक, अंबड) अशी गांजाची खरेदी विक्री करतांना मिळून आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिस चौकीचे पोलिस नाईक समाधान भाऊसाहेब चव्हाण यांनी तक्रार दाखल केली आहे. महामार्गावरील गरवारे पॉईंट भागात अमलपदार्थाची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि.६) सापळा लावण्यात आला असता संशयित आपल्या वाहनांसह पोलिसांच्या जाळयात अडकले. या छाप्यात रिक्षामधून प्लॅस्टीकच्या गोणीत आणलेल्या गांजा या अमली पदार्थाचा व्यवहार सुरू होता.
या कारवाईत दुचाकीस्वार खरेदीदारासह रिक्षाचालक विक्रेत्यास बेड्या ठोकण्यात आल्या असून गोणीत ओलसर पान व फुल बिया आणि देठ असलेल्या गांजाचा साठा मिळून आला. या कारवाईत गांजा साठ्यासह अॅटोरिक्षा आणि दुचाकी हस्तगत करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक संदिप पवार करीत आहेत.
nashik city crime theft ganja arrest police