नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ९३ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना सिडकोतील पाटील नगर भागात घडली. या घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरुन नेले.
याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जमुनाबाई शिवाजी परदेशी (रा.एन ५३-६-५ पाटील नगर,त्रिमुर्ती चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. परदेशी कुटूंबिय गेल्या शुक्रवारी (दि.१४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९३ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.
शहरातून तीन दुचाकी चोरीला
शहरात वेगवेगळया भागातून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी म्हसरूळ,अंबड व नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना नाशिकरोड येथील शास्त्रीपथ भागात घडली. योगेश मुरलीधर नवले (रा.मंदार गणेश सोसा.बादशाह हॉटेल समोर राजेंद्र कॉलनी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नवले यांची एमएच १५ डीबी ८५९९ दुचाकी सोमवारी (दि.१७) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
दुस-या घटनेत म्हसरूळ येथील अश्विनी अविनाश जानोरकर (रा.सुर्यशक्ती अपा.गोरक्षनगर) यांची मेस्ट्रो दुचाकी एमएच १५ एफबी १७५७ गेल्या शनिवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.
तिसरी घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली. याबाबत राजेंद्र राजेंद्र लालजीभाई सरदार (रा.शुभम पार्क,उत्तमनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. सरदार यांची एमएच १४ सीएन ६७४५ ही दुचाकी गेल्या गुरूवारी (दि.१३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली असताना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.