नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईच्या व्यापा-याने तब्बल ४५ लाखास नाशिकच्या व्यापा-याची फसवणूक केली आहे.भाजीपाला आणि फ्रुट खरेदी विक्री व्यवसायात हा गंडा घातला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांतील उधारीच्या धंद्यात, काही रक्कम अदा करीत माल उचलून उवर्रीत उधारी वाढविल्याने हा प्रकार घडला आहे. मुंबईच्या व्यापा-याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप मेवालाल गुप्ता (रा.साई एक्सपोर्ट,एपीएमसी फ्रुट मार्केट तुर्भे नवी मुंबई) असे ठकबाज व्यापा-याचे नाव आहे. याप्रकरणी हरिश मेवालाल वैश्य (रा.झनकर सोसा.टकलेनगर,गणेशवाडी) यांनी तक्रार दाखल केली आहे. वैश्य यांचा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि फ्रुट खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. मार्केट यार्डात शेतमाल घेवून येणा-या शेतक-यांचा माल खरेदी करून ते गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई येथील संशयितास पाठवित होते.
परदेशी महिलेची बॅग कारमधून लांबवली
मखमलाबाद रोडवर परदेशात राहणा-या भारतीय महिलेची कारमधून ट्रव्हल्स बॅग चोरट्यांनी लंपास केली. या बॅगेत सुमारे सव्वा नऊ लाखाचा ऐवज होता. याप्रकरणी उर्वी प्रभाकर पिपंरकर (मुळ रा.क्विन्सलॅण्ड,ऑस्ट्रेलिया सध्या सिनार संकुल,बॉईज टाऊन जवळ कॉलेजरोड) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिपंरकर या गेल्या काही दिवसांपासून भारतात आल्या आहेत. नाशिकमध्ये सध्या त्या वास्तव्यास असून मंगळवारी (दि.४) मखमलाबाद रोडकडून पेठरोडच्या दिशेने आपल्या कारमधून प्रवास करीत होत्या. रॉयल बेकरी भागात त्या खरेदीसाठी थांबल्या असता ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडून ट्रव्हल्स बॅग चोरून नेली. या बॅगेत लॅपटॉप, आयपॅड, सोन्याचे दागिणे, कपडे, कॉस्मेटीक वस्तू असा सुमारे ९ लाख २३ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास उपनिरीक्षक भरसट करीत आहेत.
nashik city crime theft cheating