नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या क्रिडांगण व जॉगिंग ट्रॅकमधील लोखंडी बाकडे चोरणा-या चोरट्यास पोलिसांनी गजाआड केले. रमेश कैलास जाधव (४० रा.सिन्नरफाटा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चोरट्याचे नाव आहे. भंगार दुकानात विक्री केलेले बाकडे आढळून आल्याने संशयित पोलिसांच्या हाती लागला असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी एजाज इसाक शेख (रा.देवळालीगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. महापालिकेच्या वतीने नाशिकरोड प्रभाग क्रमांक १९ मधील पंपीग चेहडी येथील विर तानाजी मालुसरे क्रिडांगण व जॉगिंग ट्रॅकमध्ये नागरीकांच्या विश्रांतीसाठी लोखंडी बाकडे बसविण्यात आले होते. ही बाकडे चोरीस गेल्याचा प्रकार रविवारी (दि.३) समोर आला. मनपाच्या वतीने भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली असता संशयिताने ती नजिम शेख यांच्या भंगार दुकानात विक्री केल्याचे आढळून आले. पोलिस तपासात संशयिताचे नाव उघड झाल्याने त्यास अटक करण्यात आले असून या ठिकाणाहून सुमारे आठ हजार रूपये किमतीचे बाकडे हस्तगत करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत.
जुगार खेळणारे ५ जण अटकेत
तीन पत्ती जुगार खेळणा-यावर कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. जुने नाशिक परिसरात हे जुगारी जुगार खेळत होते. या जुगारींच्या ताब्यातील रोकड व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश रूपचंद तासबंड (४० रा.महालक्ष्मीचाळ,द्वारका), गणेश सुरेश रणशिंगे (२७ रा.पंडीत जवाहरलाल नगर,द्वारका), राहुल शांताराम खरात (२१ रा.कुंदेवाडी ता.निफाड), गोरख किसन जाधव (३४ रा.मोठा मातंगवाडा,महालक्ष्मीचाळ) व अक्षय दिलीप पवार (२६ रा.महात्मा फुले पुतळया्जवळ, महालक्ष्मीचाळ, बागवानपुरा) अशी संशयित जुगारींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलिस शिपाई योगेश माळी यांनी तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.३) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सप्तशृंगी मंदिर परिसरात उघड्यावर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला असता संशयित पैसेलावून उघड्यावर तीन पत्ती जुगार खेळत होते. संशयितांना अटक करीत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील रोखरक्कम आणि जुगाराचे साहित्य हस्तगत केले असून संशयितांची लागलीच जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक संदिप शेळके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Theft arrested