नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हार्डवेअरचे दुकान फोडून चोरट्यांनी सव्वा तीन लाख रूपयांचा दुकानातील माल चोरट्यांनी लंपास केले. यात नळ व वॉल मिक्सरचा समावेश आहे. ही घटना पळसे येथी घडली असून गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश हिरालाल पटेल (रा.पळसे ता.जि.नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. पटेल यांचे पळसे बसस्टॅण्ड परिसरात उमा सेल्स नावाचे हार्डवेअर आणि प्लंबिगचे दुकान आहे. बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी लोखंडी शटरचे कुलूप तोडून दुकानातील सुमारे ३ लाख २६ हजार ४०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. त्यात टॉप्सन,एलिगंझा व वॉटर टँक कंपनीचे नळ आणि वॉल मिक्सरचा समावेश आहे. अधिक तपास उपनिरीक्षक गांगुर्डे करीत आहेत.
भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध पादचारी ठार
त्र्यंबकरोडवरील सातपूर परिसरात भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ६० वर्षीय वृध्द पादचारी ठार झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेंद्र प्रसाद सिंग (रा.दादासाहेब गायकवाड नगर,राजवाडा) असे मृत वृध्द पादचारीचे नाव आहे.
सुरेंद्र सिंग गुरूवारी (दि.२०) सायंकाळच्या सुमारास त्र्यंबकरोडने पायी जात असतांना हा अपघात झाला. कामगारनगरच्या दिशेने ते पायी जात असतांना महापालिका कार्यालया समोर नाशिककडून त्र्यंबकच्या दिशेने भरधाव जाणाºया मोटारसायकलने त्यांना धडक दिली. या अपघातात सिंग यांच्या डोक्यास व तोंडास गंभीर दुकापत झाल्याने मुलगा राजेंद्र सिंग यांनी तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.