नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोका मार्ग भागात खिडकीत हात घालून चोरट्यांनी घरातील रोकडसह दागिण्यांवर डल्ला मारला. ही घटना घडली असून या घटनेत चोरट्यांनी रोकड मोबाईल आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात चोरीचा गु्न्हा दाखल करण्यात आला आहेत.
द्वारका दशरथ साबळे (रा.शेख मळा,कल्पतरूनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साबळे रविवारी (दि.२१) अल्पशा कामासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरच्यांनी त्यांच्या बंद घराची खिडकी उघडून ही चोरी केली.
अज्ञात चोरट्यांनी बेडरूमची खिडकी उघडून हात घालून कपाटाचा दरवाजा उघडला व क श्याच्या तरी सहाय्याने कपाटात टांगलेली पर्स काढून नेली. या पर्स मध्ये रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ८० हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता.