नाशिक शहरात वाहनचोरी आणि घरफोडीचे सत्र सुरूच…
एकाच दिवसात एवढे गुन्हे दाखल….
शहरातून पाच मोटारसायकल लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून, वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी पाच मोटारसायकली चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, गंगापूर,सातपूर, अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरदार चौकातील शंकराचार्य मठ भागात राहणारे चंदन अजय पांडे यांची एमएच १५ जीसी ९२६७ मोटारसायकल रविवारी (दि.९) सकाळच्या सुारास शंकराचार्य मठासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार सुनिल शेवाळे करीत आहेत.
दुसरी घटना गंगापूररोड भागात घडली. चंदन गुलाब हांडे (रा.चंदनशिल्प बंगला, नवश्या गणपतीनगर आनंदवली) यांची एमएच १५ डीए ३४८९ अॅक्टीव्हा गेल्या गुरूवारी (दि.६) दुपारच्या सुमारास घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.
तिसरा प्रकार सातपूर औद्योगीक वसाहतीत घडला. समाधान उदयसिंग पाटील (रा.संभाजी कॉलनी, श्रमिकनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांची एमएच १५ ए ९५२० युनिकॉर्न मोटारसायकल रविवारी (दि.९) रात्री महेंद्रा सोना कंपीच्या मेनगेटच्या बाजूला पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार मुसळे करीत आहेत.
चौथी घटना सिडकोतील सावतानगर भागात घडली. तुषार दामोदर भदाणे (रा.हिरे विद्यालयाजवळ, सावतानगर) यांनी फिर्याद दिली आहे. भदाणे यांची इलेक्ट्रीक मोटारसायकल गेल्या बुधवारी (दि.५) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनतोडे करीत आहेत.
मोनाली योगेश गावंडे (रा. प्रभा आशिष रेसि. के.जी.मेहता हायस्कूल जवळ) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ डी.डब्ल्यू ०५१७३ गेल्या मंगळवारी (दि.४) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेजवळ करीत आहेत.
दोन घरफोड्यांमध्ये तीन लाखाचा ऐवज लांबवला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीची मालिका सुरू असून वेगवेगळ्या भागात झालेल्या दोन घरफोंडीमध्ये चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सोन्याचांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली तक्रार सुमिता मुकेश शर्मा (रा. जय सच्चिदानद भवन सरस्वतीनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शर्मा कुटूंबिय २३ आॅगष्ट ते २१ आॅक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घरफोडी झाली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घर फोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सुमारे २ लाख ६५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुरंजे करीत आहेत.
दुसरी घरफोडी उपनगर येथील इच्छामणी मंगल कार्यालय भागात झाली. याबाबत अभिजीत विजयसिंग निंबाळकर (रा.इच्छामणी अपा. गणेश कॉलनी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. निंबाळकर कुटूंबिय ५ ते ८ आॅक्टोबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोंयडा तोडून कपाटातील सुमारे ३९ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
कामगार महिलेचा विनयभंग
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरिर सुखाची मागणी करीत एका कंपनी संचालकाने कामगार महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकल्पाची माहिती देण्याचा बहाणा करून भामट्याने महिलेस कारमध्ये बसवून घेत हे कृत्य केले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शिंदे (रा.पिंपळगाव ब.ता.निफाड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कंपनी संचालकाचे नाव आहे. संशयित सातपूर येथील सुमा शिल्ड अॅड कायझेन सोल्युशन नावाच्या कंपनीचा संचालक आहे. जत्रा हॉटेल भागात राहणाºया पिडीत महिलेस संशयिताने संपर्क साधून कंपनीच्या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी गेल्या १८ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास महामार्गावरील एसबीआय बँक भागात बोलावले होते.
प्रकल्पासह तुमच्या कामाच्या स्थगिती बाबत बोलायचे आहे असे सांगून त्याने महिलेस एमएच ४१ एएन ३४२१ या कारमध्ये बसविले. कारमधून नववा मैल भागात घेवून जात त्याने महिलेकडे शरिर सुखाची मागणी करीत विनयभंग केला. या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
संशयिताने कुठेही काम मिळू देणार नाही दम भरल्याने भेदरलेली पिडीतेने कुठेही वाच्यता केली नाही. मात्र संशयिताचा अतिरेक वाढल्याने पिडीतेने शेजारी महिलेस सोबत घेत पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक योगिता पाटील करीत आहेत.
घरासमोरील दुचाकी पेटवली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात समाजकंटकानी पेटवून दिली. ही घटना सातपूर येथील स्वारबाबानगर भागात घडली. प्रेमप्रकरणात वादाची ठिणगी पडल्याने संतप्त प्रियकरानेच दुचाकी पेटवून दिल्याचा आरोप प्रेयसी महिलेने केला आहे. या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक सोरटे (३० रा.जेतवननगर, नेहरूनगर समोर ना.रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाब सिध्दार्थ चौकात राहणाºया ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी (दि.९) रात्री ही घटना घडली. महिलेच्या घरासमोर लावलेली डिओ मोपेड अज्ञात समाज कंटकांनी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिली.
या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून सदर महिलेने आपल्या प्रियकरावर संशय व्यक्त केला आहे. प्रेमप्रकरणात भांडण झाल्याने संशयिताने हे कृत्य केल्याचा तिने फिर्यादीत नमुद केले आहे. दोघांमध्ये प्रेमसंबध असून काही दिवसांपूर्वी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते.
त्यातूनच संशयिताने आपली दुचाकी पेटवून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. अधिक तपास हवालदार खिरपडे करीत आहेत.







