नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – साडे १३ लाख रूपये किमतीच्या डाळींबाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुवाहाटी येथे हे डाळिंब व्यापा-याने पाठवले होते. पण, वाहनचालक व क्लिनरने ते परस्पर लंपास केले. अंकित रामसिंग सेंगर (रा.कानपूरनगर,उत्तरप्रदेश) व राहूल धर्मेद्र यादव (रा.सेलवासा,दादर नगर हवेली) अशी संशयित चालक आणि क्लिनरचे नाव आहे.
याप्रकरणी डाळींब व्यापारी सरताज मुस्ताक खान (मुळ रा.कानपुर हल्ली सनर्थ नगर,आडगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. खान यांनी गेल्या बुधवारी (दि.२६) नाशिक मार्केटमध्ये आसाम राज्यातील गोहाटी येथे पोहचविण्यासाठी डाळींब खरेदी केला होता. हा माल त्यांनी डीडी ०२ जी ९२६९ या मालवाहूतक करणा-या वाहनात लोड केला असता ही घटना घडली. सुमारे १७ लाख २४ हजाराच्या डाळींब मालासह त्यांनी वाहनात सुर्यावुड कंपनीचे स्टो (गॅस शेगड्या) भरूण गोवाहाटीच्या दिशेने रवाना केला होता. मात्र संशयितांनी हा माल गोवाहाटी येथे पोहचविला नाही. संपर्क होवू न शकल्याने खान यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार नरवडे करीत आहेत.
सुचुतानगरमध्ये घरफोडी
घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३३ हजाराच्या ऐवज लंपास केल्याची घटना सुचितानगर भागात घडली. या घरफोडीत रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे चोरट्यांनी चोरुन नेले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमेश भगवंत पाठक (रा.आकृती अपा. लेन. ३ सुचितानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाठक कुटुंबिय गेल्या गुरूवारी (दि.२९) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलप व कडीकोयंडा तोडून कपाटातील रोकड,सोन्याचे दागिणे व चांदीचे भांडे असा सुमारे ३३ हजार १२५ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत