नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील पाटीलनगर भागात पोस्टातून पैसे काढून घराकडे परतणा-या वृध्दाच्या हातातील पिशवी बुलेटस्वारांनी पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी रंगनाथ बबनराव माळवे (७८ रा.नवनाथ हार्डवेअर समोर त्रिमुर्तीचौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अंबड पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पिशवीत रोकडसह मोबाईल आणि पासबुक असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज होता. माळवे मंगळवारी (दि.२७) पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये गेले होते. दुपारी एकच्या सुमारास ते पैसे काढून घराकडे परतत असतांना ही घटना घडली.
पाटील नगर येथील महादेव मंदिराजवळून ते आपल्या घराकडे पायी जात असतांना राखाडी रंगाच्या बुलेटवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या हातातील कापडी पिशवी हिसकावून पोबारा केला. या पिशवीत रोकड,मोबाईल व पोस्टाचे दोन पासबुक असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज होता.अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खतेले करीत आहेत.