नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुंतवणुकीवर अधिकच्या परताव्याचे आमिष दाखवून एकास सव्वा तीन लाखास गंडा घातला आहे. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुक आणि आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णूकुमार सुरेंद्रकुमार बेटकरी (रा.रजत पार्क वनश्री कॉलनी,अंबड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
बेटकरी यांच्याशी जानेवारी महिन्यात इन्स्टाग्राम या सोशल साईडच्या माध्यमातून भामट्यांनी संपर्क साधला होता. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुक केल्यास भरघोस मोबदला मिळेल असे आश्वासन देत अॅक्सीस, आयसीआयसीआय, आयडीएफसी व येस बॅके च्या विविध खात्यात बेटकरी यांना पैसे टाकण्यास भाग पाडले. एका महिन्यात बेटकरी यांनी ३ लाख २५ हजाराची गुंतवणुक केली. मात्र भामट्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मोबदला मिळाला नाही. त्यामुळे बेटकरी यांनी संबधीताशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली असून, अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.
नाशिक शहरात दोघांची आत्महत्या
शहरात सोंमवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यात एका तरूणीसह युवकाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात मृत्युच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना आनंदनगर भागात घडली. दिपक चतुर कोळी (२५ मुळ रा. काठेली जि.नंदूरबार हल्ली ज्योती रेसि.कदम लॉन्स आनंदनगर) याने सोमवारी (दि.३१) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडील चतुर कोळी यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार माळोदे करीत आहेत.
दुस-या घटनेत दिव्याश्री चंद्रकांत वडक्ते (२४ रा.गोदामाय हौ.सोसा.मोरारीनगर,अंबड) या युवतीने सोमवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मामा अनिल बागले यांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक उमाकांत टिळेकर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten