नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात शुक्रवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना जेलरोड भागात घडली. नितीन रामचंद्र निळ (४७ रा. शिल्पस्वामी अपा. करंजकर नगर, आढाव रोड) यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्यास बेडशिट बांधून गळफास लावून घेतला होता. मात्र बेडशिट फाटल्याने खाली पडून डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ज्ञानेश बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोत घडली. येथील सचिन रविंद्र पगारे (३५ रा. लेखानगर वसाहत क्र.२, सिडको) या युवकाने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी कोणी नसतांना अज्ञात कारणातून छताच्या बल्लीला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत विठ्ठल कांबळे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार राऊत करीत आहेत.