नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवारी शहर व परिसरात वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. या चार आत्महत्यांमध्ये तीघांनी गळफास लावून घेत तर एका ७२ वर्षीय वृध्दाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. याप्रकरणी म्हसरूळ,नाशिकरोड,आडगाव व गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिली घटना औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. सागर प्रभाकर जंजाळ (३० रा.समर्थ विहार,बी.आय.हॉस्पिटल जवळ,शिवाजीनगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत आकाश जंजाळ यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.
दुसरी घटना अमृतधाम भागात घडली. मनोहर आण्णाजी नागोटी (७२ रा.गंगोत्री विहार,अमृतधाम) यांनी गेल्या ३१ मे रोजी दुपारी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. कुटुंबियांनी त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ.आशिष शिरोडकर यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
तिसरी घटना जेलरोड भागात घडली. संतोष शिवाजी दांडेकर (३४ रा.भैरवनाथ नगर,पंचक) यांनी रविवारी अज्ञात कारणातून एकलहरा ट्रॅक्शनरोडवरील भोर मळयात असलेल्या आपल्या राहत्या घरात वाश्याला स्कार्फ बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हरिष दांडेकर यांनी खबर दिल्याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.
चौथी घटना मखमलाबाद परिसरात घडली. येथील स्वप्निल विलास भोज (३० रा.लिलावती हॉस्पिटल,विद्यानगर) यांनी रविवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये छताच्या लोखंडी गजाला बेडशिट बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शेजारी हेमंत निकम यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.