नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिरावाडी भागात विषारी सेवन करून ४३ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. दिनकर किसन रेहरे (मुळ रा.हस्ते दुमला,कसबे वणी ता.दिंडोरी हल्ली मायको स्कूलजवळ हिरावाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रेहरे यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेहरे यांनी गुरूवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच दौलत भोये यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता मध्यरात्री उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.









