नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर व परिसरात सोमवारी वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. याप्रकरणी देवळाली कॅम्प आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येत ३३ वर्षीय महिलेसह ६५ वर्षीय वृध्दाचा समावेश आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विद्या बहिरू लोहकरे (रा.शिवनेरी,विजयनगर दे.कॅम्प) या महिलेने सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत बहिरू लोहकरे यांनी दिलेल्या खबरीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
दुसरी घटना दिंडोरीरोडवरील प्रभातनगर भागात घडली. बाळू त्र्यंबक गोसावी (६५ रा.सिध्दी हाईटस,अन्नपूर्णा मेस शेजारी प्रभातनगर,दिंडोरीरोड) यांनी सोमवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील खिडकीस दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा भगवान गोसावी यांनी त्याना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. राम पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास अंमलदार फुलपगारे करीत आहेत.