नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात रविवारी वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केली. यात आत्महत्येत एका विवाहीतेचा समावेश आहे. याबाबत अंबड, इंदिरानगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती कैलास संगम (३० रा.म्हाडा कॉलनी,अंबड लिंकरोड) या विवाहीतेने शनिवारी रात्री आपल्या राहत्या घरात पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत कैलास मगर यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरी घटना पांडवनगरीत घडली. विजय अभिमन पाटील (३२ रा.द्रोणाचार्य बिल्डींग,पांडवनगरी,इंदिरानगर) यांनी रविवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनरूममध्ये लोखंडी हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. अभिमन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खरोटे करीत आहेत.
तिसरी घटना पळसे गावात घडली. योगेश्वर दिगंबर शिंदे (२१ रा. पळसे ता.जि.नाशिक) या युवकाने रविवारी अज्ञात कारणातून आपल्या घराच्या पाठीमागील लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये अडगईला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुनिल गायधनी यांनी खबर दिली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.