नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. या घटनेत एकाने विषारी औषध सेवन करून तर २५ वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. याप्रकरणी सरकारवाडा आणि अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना कामटवाडा भागात घडली. अमोल मुरली पानेकर (२५ रा.त्र्यंबक बंगलो,कमलनगर अपा.कामटवाडा) या युवकाने शुक्रवारी (दि.१४) आपल्या राहत्या घरातील बेडरूम मध्ये अज्ञात कारणातून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत सागर राणे यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक महाजन करीत आहेत.
दुस-या घटनेत कडूजी सिताराम गवांदे (५३ रा.कॅनडा कॉर्नर,शरणपूर) यांनी गेल्या १७ जून रोजी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. मुलगा अजय गवांदे यांनी तातडीने त्यांना जिल्हा रूग्णालयात प्रथमोपचार करून पंचवटीतील ग्रॅव्हीटी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. आठवडाभराच्या उपचारानंतरही त्यांच्या प्रकृर्तीत सुधारणा न झाल्याने त्यांना लोणी ता. राहता येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतांना २९ जून रोजी त्यांना डॉ. रेहा रेगी यांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संभाजी कुसळकर यांनी दिलेल्या खबरीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.