म्हाडा कॉलनीत एकावर वार
नाशिक – चुंचाळे शिवारातील म्हाडा घरकूल योजनेत शुक्रवारी (ता.१) सायंकाळी सातला दोघांनी एकावर धारदार शस्त्राने वार करुन जखमी केले. उध्दव उर्फ अशोक राजगिरे (वय २०) मंगेश संतोष साळवे (वय२०) म्हाडा घरकूल योजना चुंचाळे अशी संशयितांची नावे असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
याप्रकरणी प्रदीप राजू खैरे (वय २४, ) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी गौतम खैरे फोनवर बोलत असतांना तेथे आलेल्या दोघा संशयितांनी असंदब्ध बडबड करीत, तुम्ही खांदेशी आहाता का अशी कुपारत काढून एकावर धारदार शस्त्राने वार केला. पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख तपास करीत आहे.
झाड तोडले म्हणून कोयत्याने वार
नाशिक – सिडकोत बदामाचे झाड का तोडले याचा जाब विचारत एकाने कोयत्याने वार केला. विकास पाटील असे संशयिताचे नाव असून तो रुग्णालयात आहे.हर्षल राजू हिरे (वय २७, शिवशक्तीनगर सिडको) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिसात ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी ३० सप्टेंबरला सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सिडकोतील शिवशक्तीनगर परिसरातील नवजीवन स्कूलच्या पाठीमागे हर्षल मामाच्या घरी पाळलेल्या कबुतरांना दाणापाणी करुन घरी
जात असतांना विकास पाटील तेथे आला व बदामाचे झाड का तोडले या कारणावरुन शिवीगाळ करीत मारहाण केली. पाठीमागे लपवून ठेवलेला कोयता काढून कोयत्याने वार केला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक नंदन बगाडे तपास करीत आहे.
शालीमार चौकात तिघांचा एकावर वार
नाशिक – बहिणीची छेडछाड का केली असे म्हणत तिघांनी एकावर चाकूचे वार केले. महेश जयसिंग थापा (वय ३२, नागजी हॉस्पीटल पखाल रोड, मूळ धनवडी गाव नेपाळ) याच्या तक्रारीवरुन भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.२) मध्यरात्री बाराच्या सुमारास शालीमार चौकात शालीमार इन हॉटेल जवळील डॉ. गोसावी दवाखान्यासमोर तिघा अज्ञातांनी बळेच एकाची काढून मेरे बहेन को क्यु छेडा असे म्हणत
शिवीगाळ करीत बरगडीच्या खाली चाकुने वार करीत जखमी केले. पोलिस हवालदार जी.बी.चौधरी तपास करीत आहेत.
सिडकोत भाजीविक्रेत्यावर चाकूने वार
नाशिक – सिडकोतील शिवाजी चौकातील शॉपीग मॉलमध्ये एकाने भाजीविक्रेत्यावर चाकुने वार केल्याचा प्रकार उघडकीस आला. गणेश विष्णु कुऱ्हाडे (वय २१, लेखानगर, इंदिरा गांधी वसाहत) असे गुंडाचे नाव आहे.याप्रकरणी मधुकर काळू दसाने (वय ५६, शिवाजी चौक सिडको) यांच्या तक्रारीवरुन अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी शनिवारी (ता.२) दुपारी तीनला शिवाजी चौकातील शॉपंग सेंटरमधील गाळ्यात विनाकारण शिवीगाळ करीत मधुकर दसाने यांच्यावर चाकूने वार केले. तसेच जीवे मारण्याची धमकी देउन पळून गेला. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.