नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी महामंडळाच्या बसचालकाविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन दिवसापूर्वी सीबीएसवर पादचारी महिलेस बसने धडक दिली होती. त्यात लता रामदास चव्हाण (४०, रा. लेखानगर वसाहत) या महिलेचा मृत्यू झाला होता. चव्हाण यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक तुकाराम शिंदे (५८, रा. सिन्नर) असे संशयित बसचालकाचे नाव आहे.
लता चव्हाण या मंगळवारी (दि.२२) सकाळच्या सुमारास रस्ता ओलांडून बसस्थानकाच्या दिशेने जात असतांना हा अपघात झाला होता. सिग्नलकडून भरधाव वेगात येणा-या एमएच ४० वाय ५६६८ या बसने त्यांना जोरदार धडक दिली होती. या घटनेत चव्हाण जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक अशोक शिंदे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरनार करीत आहेत.
कृषीनगरला सुरू होता हुक्का पार्लर
बार अॅण्ड रेस्टॉरंट मध्ये चालणारा हुक्का पार्लरचा अड्डा पोलिसांनी उदध्वस्त केला. कृषीनगर भागातील केलेल्या या कारवाईत प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांसह हुक्का पिण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात हुक्का पार्लरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक सुब्रमन्यम मंजिताया (३६ रा. मातोश्री अपा.नवशक्तीचौक,भाभानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हुक्का पार्लर चालकाचे नाव आहे.
कृषीनगर जॉगींग ट्रॅक भागातील एका बार आणि रेस्टॉरंटमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरूवारी (दि.२४) पोलिसांनी जानकी हाईटस या इमारतीतील तिस-या मजल्यावर असलेल्या नेक्स्ट लेवल रेस्टॉरंट अॅण्ड बारवर छापा टाकला. यावेळी संशयिताने स्व:ताच्या आर्थिक फायद्यासाठी हुक्का पार्लर चालवून ग्राहकांना सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांसह हुक्का पिण्यासाठी साहित्य उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून सुमारे ५ हजार १५० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी शिपाई मच्छींद्रनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक परदेशी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten