नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोड भागात भंगार दुकानातून एकाने गल्यातील रोकडसह मोबाईल असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी याप्रकरणी हयात झिंकू चौधरी (रा.पवार लॉन्स समोर,पेठरोड) यांनी तक्रार दाखल केली असून म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
ही चोरी दुकानातील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाल्याने ही चोरी उघडकीस आली आहे. अक्षय राजाराम खोडे (रा.तळेगाव ता.दिंडोरी) असे दुकानातील ऐवजावर डल्ला मारणा-या संशयिताचे नाव आहे. चौधरी यांचे दिंडोरीरोडवरील विजयराज नर्सरी भागात साईराज चौधरी एन्टरप्रायझेस नावाचे भंगार दुकान असून तेथे ही घटना घडली.
बुधवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास चौधरी अल्पावधीच्या कामासाठी नेहमीप्रमाणे दुकान उघडे ठेवून नजीकच कामानिमित्त गेले असता ही घटना घडली. संशयिताने उघड्या दुकानात शिरून गल्यातील रोकड व मोबाईल असा सुमारे ७५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार देवराम चव्हाण करीत आहेत.
चॉपर घेऊन फिरणारे जेरबंद
दुचाकीवर चॉपर घेवून फिरणा-या सातपूरच्या दोघांना पोलिसांनी गजाआड करुन संशयितांच्या ताब्यातून धारदार चॉपरसह दुचाकी असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. विक्रम राजेंद्र सुरडकर (२३ रा.माळुंजकर बिल्डींगजवळ,शिवाजी चौक सातपूर) व करण कृष्णा नागरे (२२ रा.महादेववाडी ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित चॉपरधारींची नावे आहेत.
याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार अनिल महाजन यांनी तक्रार दाखल केली आहे. गंजमाळ परिसरात फिरणा-या दुचाकीस्वारांकडे धारदार चॉपर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार बुधवारी (दि.१६) पोलिसांनी धाव घेतली.
त्यानंतर खब-याने दिलेल्या माहितीनुसार संशयितांना हुडकून काढत त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार चॉपर मिळून आला. संशयितांच्या दुचाकीसह चॉपर जप्त करीत पोलिसांनी दोघांना अटक केली असून अधिक तपास पोलिस नाईक सचिन म्हसदे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten