नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वन आधिकाऱ्यांच्या बंगल्यानंतर चोरट्यांनी चंदन चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी चोरट्यांनी ही चोरी केल्याचे उघ़कीस आले. वन विभागाचे वरिष्ठ आधिकारी उपवनसंरक्षक उमेश वावरे यांच्या रामशेज या शासकीय बंगल्याच्या आवारात ही चोरी झाली आहे.
या चोरीप्रकरणी विशाल देविदास आहिरे (वय ३१, साई संकूल, कामटवाडे ) यांच्या तक्रारीवरुन गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन चोरांनी थेट शासकीय वसाहतीत असणा-या बंगल्यातून चंदनाच्या झाडाचा बुंदाच कापून नेला. बुधवारी १६ ऑगस्टला रात्रीतून केव्हातरी हा प्रकार घडला आहे. त्यानंतर गुरुवारी हा प्रकार लक्षात आला.
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी असलेल्या अॅपे चालकाचा मृत्यु
अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी असलेल्या अॅपचालकाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. सिन्नर – पुणे मार्गावर अंबडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला होता. गेल्या महिन्यात २६ जुलैला साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला होता. बाळू घोटे असे मृत चालकाचे नाव आहे. या अपघात विषयी समजलेली माहिती अशी की, सिन्नर – पुणे मार्गावर अज्ञात वाहनाने अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली होती. त्यात, बाळू दामू घोटे (वय ५०, अंबड) हे गंभीर जखमी झाले होते. गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. गुरुवारी उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Sandalwood Theft Accident