नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्यावर आरडाओरड करणे तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. जमाव बंदी आदेश असतांना त्यांनी भर रस्त्यात शांततेचा भंगही केला. त्यामुळे या तरुणांविरुध्द पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जमावबंदी कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक रस्त्यावर आरडाओरड करुन हे तरुण शांततेचा भंग करत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
निवृत्ती दौलत बेंडकुळे, सुरज सुभाष मोहिते,नितीन विलास पिंगळे,संतोष तानाजी दिवे,शरद चंद्रभान चारोस्कर व ओंकार पांडूरंग चारोस्कर अशी संशयितांची नावे आहेत. रविवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास संशयित मखमलाबाद शिवारातील आयुर्वेदीक कॉलेजसमोर एकमेकांमध्ये झुंज करतांना मिळून आले. भररस्त्यात आरडाओरड करीत संशयितांनी शांततेचा भंग केल्याचा आरोप असून जमाव बंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस नाईक रमेश ढुमसे यांनी तक्रार दाखल केली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
वॉचमनचा मोबाईल आणि लोखंडी स्टील लंपास
मखमलाबाद नाका भागात बांधकाम साईटवरून चोरट्यांनी वॉचमनचा मोबाईल आणि लोखंडी स्टील चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजी एकनाथ गायखे (रा.एकदंत अपा.तुलसी कॉलनी अमृतधाम) यांनी तक्रार दाखल केली असून पंचवटी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायखे मधुबन कॉलनीतील दर्पन संकुल जवळील नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटचे काम बघतात. गेल्या शनिवारी (दि.२६) रात्री ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बांधकाम साईटवरील वॉचमनचा मोबाईल आणि लोखंडी स्टील असा सुमारे १३ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Road Hurly Burly Police Booked