नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीतील सातपूर अंबड लिंक रोडवर भरधाव हायवा मालट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवर डबलसिट प्रवास करणा-या ३० वर्षीय विवाहीतेचा मृत्यू झाला. पुनम नितीन चव्हाण (३० रा. विश्वास महाराज मंदिर, ता. शेवगाव कांबी, जि. अहमदनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर येथील पुनम चव्हाण या अपंग वडिलांच्या देखभालीसाठी काही दिवसांपूर्वीच शहरात आली होती. तिच्या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चुंचाळे शिवारातील म्हाडा वसाहतीत अपंग वडिल रहातात. त्यांच्या देखभालीसाठी पुनम चव्हाण आली होती. मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास ती शेजारी राहणा-या नातेवाईका सोबत (एमएच १५ बीएक्स ९६८७) या दुचाकीवर सातपूर येथे जात असतांना हा अपघात झाला. सातपूर अंबड लिंकवरून दोघे डबलसिट प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या हायवा मालट्रकने (एमएच ४४, ९१२५) या दुचाकीस धडक दिली.
या अपघातात विवाहीतेचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार नातेवाईक किरकोळ जखमी झाला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई अनिल कु-हाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिस ठाण्यात ट्रक चालक कांतीलाल नागनाथ वेताळ (रा. बजरंगवाडी, विल्होळी) याच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Road Accident Women Death Married