नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव दुचाकी घसरल्याने ६५ वर्षीय वृध्दाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सातपूरमधील अशोकनगर भागात झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी जगदिश बोरसे (रा.समर्थ बँकेच्या मागे जाधव संकुल, अशोकनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. बोरसे सोमवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास औद्योगिक वसाहतीतून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. अशोकनगर येथील बागुल ड्रायव्हींग स्कुल भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ते जखमी झाले होते. सामाजिक कार्यकर्ते दीपक उगले यांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.
हिरावाडीत विवाहितेची आत्महत्या
हिरावाडी भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहीतेने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मौलिका महेशभाई पटेल (रा.द्वारका पॅलेस,मौनगिरीनगर) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. पटेल यांनी सोमवारी (दि.३१) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हितेशभाई पटेल यांनी दिलेल्या खबरीवरून पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.
Nashik City Crime Road Accident Suicide