नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगिक वसाहतीत भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. रविंद्र पुरूषोत्तम कुलकर्णी (६४ रा.राज्य कर्मचारी वसाहत,सातपूर) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुलकर्णी मंगळवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास औद्योगीक वसाहतीतून ज्युपिटर दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. आरपी स्विटस कडून फॉर्च्युना कंपनीरोडने ते औद्योगिक विकास महामंडळाच्या दिशेने प्रवास करीत होते. त्याचवेळी गंगामाई इडस्ट्रीयल इस्टेट समोर भरधाव स्विफ्टकारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कुलकर्णी यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिस शिपाई महेश सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश पवार(रा.लवटेनगर, जयभवानीरोड) या कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.
जुगार खेळणाऱ्या तिघांवर कारवाई
जुगार खेळणा-या त्रिकुटावर पोलिसांनी कारवाई करत रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त केले आले शरणपूररोडवरील बीएसएनएल ऑफिस समोरील मोकळया जागेत उघड्यावर हे तिघे जुगार खेळत होते. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
सचिन प्रकाश काळे (रा.विष्णूनगर,गणेशवाडी),माधव किसन माळी (रा. मायको सर्कल,त्र्यंबकरोड) व प्रकाश जगन्नाथ पाल (रा.मिशनमळा,शरणपूररोड) अशी कारवाई करण्यात आलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. याप्रकरणी युनिट १ चे कर्मचारी प्रशांत मरकड यांनी फिर्याद दिली आहे. शरणपूर गावठाण भागातील बीएसएनएल ऑफिस समोरील मोकळया जागेत काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास पथकाने धाव घेत छापा टाकला असता साहराबाई भोसले यांच्या चाळीजवळील मोकळया जागी उघड्यावर संशयित टाईम क्लोज,मिलन ओपन,कल्याण ओपन बाजार नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातील रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास हवालदार राजपूत करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik city crime Road Accident Death