नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील आयटीआय सिग्नल परिसरात भरधाव मालवाहू टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. प्रकाश हिरामण भामरे (४२ रा.साई पेट्रोल पंपाजवळ,ध्रुवनगर गंगापूर शिवार) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भामरे गेल्या ३० ऑगष्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आयटीआय सिग्नलकडून कामगार नगरच्या दिशेने आपल्या अॅक्टीव्हा दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. युनियन बँक नजीकच्या ऑटोकॅल कंपनी समोरून ते प्रवास करीत असतांना समोरून भरधाव आलेल्या लेलंड कंपनीच्या टेम्पोने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या भामरे यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी सहाय्यक उपनिरीक्षक गावीत यांनी दिलेल्या तक्रारीवरून टेम्पो चालक चंद्रकांत सुदाम घिघे (रा.कल्याणीनगर,आनंदवली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी ५९ हजाराचा ऐवज केला लंपास
घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ५९ हजाराचा लंपास केले. जुने नाशिक परिसरातील पाटील गल्ली भागात ही घरफोडी झाली. यात चोरट्यांनी सोन्याचांदीचे दागिणे रोकड चोरुन नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रेय भास्कर टाळकुटे (रा.मातृ कौशल्या अपा. शिरीषकुमार चौक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. टाळकुटे कुटुंबिय सोमवारी (दि.४) बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ५९ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Road Accident Dacoity