नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक – पुणे मार्गावरील गुरूद्वारासमोर भरधाव कंटेनरच्या धडकेत ७३ वर्षीय पादचारी वृध्द ठार झाले. पंडीत शंकर पगारे (रा.अमर हौ.सोसा.शिखरेवाडी) असे अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून कंटेनर चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पगारे सोमवारी (दि.७) दुपारच्या सुमारास पुणे रोडवरील गुरूद्वारासमोर रस्ता ओलांडत असतांना हा अपघात झाला. नाशिककडून पुण्याच्या दिशेने भरधाव कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात पगारे गंभीर जखमी झाल्याने स्थानिकांनी तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ. प्राजक्ता कडवे यांनी त्यांना मृत घोषीत केले.
याबाबत पोलिस शिपाई ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस दप्तरी चालक समाधान राजाराम रानडे (रा.वांगणी पेठ ता.जि.नाशिक) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वायकर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten