नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याच्या रागातून एकाने तरूणास वीट फेकून मारल्याची घटना नांदूरनाका भागात घडली आहे. या घटनेत तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश गांगुर्डे (रा.जनार्दन नगर,नांदूरनाका) असे विट मारणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी विशाल किसन धनराळे (२९ रा.निसर्ग नगर,नांदूरनाका) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. धनराळे रविवारी (दि.२०) नांदूरनाका येथील समर्थ हेअर कटींग दुकान परिसरातून जात असतांना तेथे बसलेल्या संशयिताने त्यास आवाज देवून जवळ बोलावून घेतले. यावेळी संशयिताने धनराळे यास दुकानातून सिगारेट घेवून येण्यास सांगितल्याने ही घटना घडली. धनराळे याने सिगारेट घेवून येण्यास नकार दिल्याने संतप्त संशयिताने त्यास विट फेकून मारली. या घटनेत धनराळे जखमी झाला असून अधिक तपास पोलिस नाईक देसाई करीत आहेत.
शहरातून दोन मोटारसायकली चोरीला
शहरात वेगवेगळया भागातून नुकत्याच दोन मोटारसायकली चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना सातपूरला घडली. मखमलाबाद येथील दिलीप नामदेव शिंदे (रा.रॉयल टाऊन जवळ) हे शुक्रवारी (दि.२५) इएसआय हॉस्पिटल भागात गेले होते. सिताराम नगर कॉम्प्लेक्स भागात त्यांनी आपली स्प्लेंडर एमएच १५ बीपी ४४६५ पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
दुस-या घटनेत सिडकोतील अनिल मधुकर चिंचोलकर हे बुधवारी (दि.२३) औद्योगीक वसाहतीतील इलेक्ट्रोक्रीम कॉन्ट्रक्ट प्रा.लि. या कारखान्यात कामानिमित्त गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची शाईन मोटारसायकल एमएच १५ एफबी ३५४७ चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten