नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंगापाडळी शिवारात धक्का का मारला या कारणातून तरूणाच्या पोटात बिअरची बाटलीच खुपसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या फोडलेल्या बाटलीने वार केल्याने या घटनेत युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी योगेश अशोक भगरे (२८ रा.पहाडीबाबा झोपडपट्टी,एकलहरा) या युवकाने तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल प्रकाश इंगोले (रा.महादेव मंदिराजवळ,इंदिरानगर राजवाडा,एकलहरा) असे तरूणास काचेच्या बाटलीने भोसकणा-या संशयिताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, भगरे गुरूवारी (दि.३१) सायंकाळच्या सुमारास परिसरातील रानमळा भागात गेला होता. यावेळी त्याचा चालतांना संशयितास धक्का लागल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने धक्का का मारला याचा जाब विचारत रस्त्यावर पडलेली बिअरची बाटली खुपसली. या घटनेत भगरे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.
जेलरोडला तरुणास बेदम मारहाण
जेलरोड भागात हात उसनवार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्याने तरुणास बेदम मारहाण केली. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी मयुर राजाराम हिरे (२१ रा.महालक्ष्मी नगर,जेलरोड) या युवकाने तक्रार दाखल केली असून नाशिकरोड पोलिस ठाण्यात चार जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन जाधव, विराज कांबळे, निखील कांबळे व त्याचा एक साथीदार अशी संशयितांची नावे आहेत.
हिरे व संशयितांपैकी एकाचे आर्थिक व्यवहार असून शुक्रवारी (दि.१) तो परिसरातील इच्छामणी हॉटेल भागात गेला असता ही घटना घडली. राव पेट्रोलपंपासमोर संशयित टोळक्याने त्यास गाठून उसने दिलेले पैसे का मागतो या कारणावरून कुरापत काढून शिवीगाळ व दमदाटी करीत हिरे यास बेदम मारहाण केली. या मारहाण प्रसंगी एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने मयुर हिरे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास पोलिस नाईक कु-हाडे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
Nashik City Crime Police Youth Attack