नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी फाटा भागात फर्निचरचे काम करण्यासाठी घरी आलेल्या मिस्तरीने महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मोरे (रा. नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी नागरेनगर भागात राहणा-या पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या पतीने फर्निचरच्या दुरूस्तीसाठी संशयितास आपल्या घरी बोलविले होते. सोमवारी (दि.८) फर्निचरचे काम सुरू असतांना संशयिताने महिला एकटी असल्याची संधी साधत तिचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक बारेला करीत आहेत.
विषारी औषध सेवन करून ५६ वर्षीय व्यक्तीने केली आत्महत्या
ध्रुवनगर भागात विषारी औषध सेवन करून ५६ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. संजय जनार्दन हरेश्वर (रा.गोकुळ अपा.प्रताप कॉलनी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हरेश्वर यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हरेश्वर यांनी मंगळवारी (दि.९) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच मुलगा राहूल यांनी त्यांना तात्काळ नजीकच्या गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.विक्रम पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक हिंडे करीत आहेत.