नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील कलानगर भागात रविवारी रस्त्याने पायी जाणा-या महिलेच्या गळयातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोनसाखळी पल्सरस्वारांनी ओरबाडून नेली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता शाम साळवे (५८ रा.रिलायन्स पेट्रोल पंपासमोर, विजयनगर, दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
साळवे रविवारी दुपारच्या सुमारास कलानगर कडून कॉलनीरोडने आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. जोशी शाळा भागात समोरून पल्सरवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळय़ातील सुमारे ९० हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655531259387604993?s=20
https://twitter.com/IndiaDarpanLive/status/1655531229759045632?s=20









