नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, विधाते गल्ली येथे राहत्या घरात महिलेचा गळा कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत स्पष्टता झालेली नसून पोलिस तपास करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशोक्तीबाई बैस (वय २९) हे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मुळ मध्य प्रदेशची आहे. तिचा पती औद्योगिक वसाहतीतील खासगी कंपनीत कामाला आहे. एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य या महिलेला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.