नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवर कट लागल्याच्या कारणातून मायलेकाने कार चालक महिलेस मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत तरूणाने चालक महिलेचा विनयभंग केला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेतन खांदवे (३६) व शिला खांदवे (५४ रा.दोघे पिंपळणारे ता.दिंडोरी) अशी कारचालक महिलेस मारहाण करणा-या संशयित मायलेकाचे नाव आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी (दि.२९) रात्री ही घटना घडली.
पीडिता दिंडोरीरोडने आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना रिलायन्स पेट्रोल पंप भागात संशयितांच्या दुचाकीस कारचा धक्का लागला. यावेळी संतप्त मायलेकाने पीडितेस शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी संशयित चेतन खांदवे या तरूणाने महिलेचा विनयभंग केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आहिरे करीत आहेत.